राज्यातील सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचे जतन तसेच पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नाट्य, संगीत, चित्रपट, लावणी, तमाशा, दशावतार, खडीगंमत अशा लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान आणि महोत्सव आयोजित करून कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!याच पार्श्वभूमीवर शासनाने आता भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रथम टप्प्यात राज्यातील १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५,००० रुपये अनुदान मिळणार आहे. या माध्यमातून एकूण ४ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतूदीतून ही रक्कम भागवली जाणार आहे.
अनुदानाचा उपयोग कसा?
या अनुदानातून भजनी मंडळांनी हार्मोनियम, मृदंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ यांसारखी आवश्यक वाद्ये व साहित्य खरेदी करणे बंधनकारक असेल.
पात्रतेचे निकष
- एका वर्षात किमान ५० कार्यक्रम सादर करणारी व पूर्णवेळ कार्यरत भजनी मंडळे पात्र ठरतील.
- मंडळात किमान २० सदस्य असणे आवश्यक आहे.
- कार्यक्रमांचे पुरावे आयोजकाचे पत्र, प्रमाणपत्र, ग्रामपंचायत दाखला किंवा इतर सक्षम कागदपत्रांच्या स्वरूपात ग्राह्य धरले जातील.
- एकदा अनुदान मिळाल्यानंतर संस्था ३ वर्षांनंतरच पुन्हा अर्ज करू शकते.
- एका मंडळाला भांडवली अनुदान जास्तीत जास्त २ वेळा मिळू शकते.
अर्ज प्रक्रिया
अनुदानासाठी अर्ज करण्याची सुविधा mahaanudan.org या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. “प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार १८०० पात्र भजनी मंडळांची निवड होणार आहे. अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार असून, अंतिम निर्णय शासनाचा राहील.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
- मंडळाची नोंदणी प्रमाणपत्र
- संस्था/मंडळ शासनमान्य किंवा नोंदणीकृत असल्याचे पुरावे.
- कार्यक्रमांचे पुरावे
- गेल्या वर्षभरात केलेल्या कार्यक्रमांचे प्रमाणपत्र, आयोजकांची पत्रे,
- हँडबिल/पोस्टर,
- ग्रामपंचायत दाखला किंवा स्थानिक संस्थेचा दाखला.
- सदस्यांची माहिती
- किमान २० सदस्यांची यादी (नाव, पत्ता, भूमिका).
- ओळखपत्रे (ID Proofs)
- मंडळातील प्रमुख सदस्यांचे आधारकार्ड/पॅनकार्ड प्रत.
- बँक खात्याची माहिती
- मंडळाच्या नावावर असलेले बँक खाते (पासबुक/रद्द केलेला चेक).
- PAN आणि GST (असल्यास)
- नोंदणीकृत संस्थेसाठी आवश्यक.
- पूर्वी अनुदान घेतले असल्यास त्याचा अहवाल
- किती रक्कम मिळाली आणि ती कशी वापरली याचा हिशेब.
- छायाचित्रे/व्हिडिओ (ऐच्छिक पण उपयोगी)
- कार्यक्रमांची छायाचित्रे किंवा व्हिडिओ लिंक पुरावा म्हणून.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा | Apply Online Now
शासनाचा उद्देश
भजनी परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागात भजनाच्या माध्यमातून सामाजिक व आध्यात्मिक जाणीवा वाढतात. त्यामुळे या लोककलेला प्रोत्साहन मिळून पुढील पिढ्यांपर्यंत हा वारसा टिकून राहावा, हा या योजनेमागचा मुख्य हेतू असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
- सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदा मध्ये 417 जागांसाठी भरतीBank of Baroda Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! बँक ऑफ बडोदाने अधिकृतपणे 2025 साठी नवीन भरतीची घोषणा केली असून एकूण 417 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2025 पूर्वी अर्ज करणे आवश्यक Thank you for reading this post, don’t forget to subscribe! तपशील माहिती 🔸 बँकेचे…
- प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना: ५५% पर्यंत अनुदान, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधीभारतामध्ये शाश्वत शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन हे फार महत्त्वाचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना Micro irrigation scheme (PMKSY) सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ५५% पर्यंत अनुदान देण्यात येते, जेणेकरून ते ठिबक व तुषार सिंचन प्रणाली वापरून पाण्याचा कार्यक्षम वापर करू शकतील. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू यांसारख्या राज्यांतील लाखो शेतकरी…
- महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनामहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा जाहीर केला आहे. “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2025” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. Thank you for reading this post, don’t forget to subscribe! राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून फायदा होईल. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही…
- १ ऑगस्टपासून ऑनलाइन पेमेंट UPI चे नवीन नियम. पहा सविस्तर ….१ ऑगस्ट २०२५ पासून UPI नियमात बदल: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने निश्चित केलेल्या आदेशांनुसार, आजपासून, १ ऑगस्ट २०२५ पासून नवीन UPI नियमांचा संच लागू झाला आहे. ऑनलाइन पेमेंट सिस्टम कशी कार्य करते हे सुधारण्यासाठी आजपासून UPI नियमात बदल लागू करण्यात आले आहेत. Thank you for reading this post, don’t forget to subscribe! जर…
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180+ जागांसाठी मेगाभरतीभारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI) तर्फे देशभरातील विविध राज्यातील शाखांसाठी ज्युनियर असोसिएट (क्लर्क) पदाच्या 5,180+ जागा भरण्यासाठी SBI Bharti म्हणजेच SBI Clerk Bharti 2025 जाहीर करण्यात आली आहे. ही State Bank of India Bharti स्थिर व सुरक्षित असून बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. Thank you…
- Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरतीMira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती मीरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२५. मीरा-भाईंदर महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील मीरा-भाईंदर शहराची प्रशासकीय संस्था आहे. एमबीएमसी…
- महाराष्ट्र सरकारकडून १८०० भजनी मंडळांना अनुदानराज्यातील सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचे जतन तसेच पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नाट्य, संगीत, चित्रपट, लावणी, तमाशा, दशावतार, खडीगंमत…
- RPF SI निकाल 2025 जाहीर : 452 उमेदवारांची निवड, येथे पाहा मेरिट लिस्ट PDFरेल्वे भरती मंडळ (RRB) तर्फे रेल्वे संरक्षण दल (RPF) उपनिरीक्षक – SI निकाल 2025 अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. संगणक आधारित परीक्षा (CBT),…
- MAHA TAIT Result 2025 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी निकाल(TAIT)- 2025MAHA TAIT (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) हा महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीसाठी घेतला जाणारा महत्त्वाचा परीक्षा निकाल आहे.हा निकाल Maharashtra State Council of Examination (MSCE),…
- BSF Bharti 2025 (Border Security Force) कडून 1121 जागांसाठी भरती जाहीर.. BSF Recrument 2025BSF Bharti 2025 (Border Security Force) कडून 1121 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सीमा सुरक्षा दल हे भारताचे एक प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, ज्यामध्ये…